Quick Links
Latest News

प्रवेश सुरु
१. इलेक्ट्रिशियन ४० जागा
२. फिटर २० जागा
अधिक माहितीसाठी इथे पहा

संस्थेविषयी थोडस..............

 

सन २००६ साली माय मदर्स एजुकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करून माय स्कूल या इंग्लीश मेडीयम स्कूलची निर्मीती करून अतिशय उत्तम रीतीने चालवल्यानंतर संस्थेचे चेअरमन डॉ.एस.बी.पाटील मोटके यांनी आपल्या भागातील औदोगिक क्षेत्राच्या विकासाचा विचार व गरज ओळखुन तसेच आपल्या भागातील सामान्य व कष्टकरी कुटुबाचे जिवनमान उंचवायचे असेल तर त्याचे हात सतत कायरत राहिले पाहिजेत त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. त्याकरीता त्यांना योग्य व कुशल कारागीर बनविण्याचे उदात्त हेतूने माय मदर्स एजुकेशन सोसायटी संचालित सन २००९ मध्ये औदोगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.

दहावी बारावीनंतर दिर्घकालीन करीअर ऎवजी लवकर रोजगार देणारा पायाय म्हणून काही विद्यार्थी औदोगिक प्रशिक्षण संस्थेकडे वळतात याच विद्यार्थांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना अनुभव संपन्न होण्यासाठी प्रत्यक्ष कारखाना किवा एखादया उद्योगात कार्यानुभावाची संधी देऊन त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम माय मदर्स औदोगिक प्रशिक्षण केंद्र करीत आहे.

प्रत्येक वर्षी गुणवतेचा आलेख चढता ठेवत आणि शासकीय योजना विद्यार्थांपर्यंत पोचवण्याची धडपड करीत संस्था शैक्षणीक पातळीवर एकेक पायरी यशाकडे वाटचाल करीत आहे.